Best 10 Marathi Poems – मराठी कविता (New)
marathi kavita

Best 10 Marathi Poems – मराठी कविता (New)

Advertisement

Marathi Poems

नमस्कार आमच्या या साइटवर तुमचे स्वागत आहे ,
आम्ही तुमच्यासोबत काही कविता share करत आहोत ,

तुम्हाला या वेबसाइटवर खूप प्रकारच्या
मराठी कविता मिळतील जसे कि marathi poems , आईविषयी , marathi kavita, आयुष्याविषयी , marathi poems on mother , marathi poems on love , प्रेमकविता Marathi Inspirational Poems ,marathi poems on love अशा खूप प्रकारच्या कविता तुम्हाला या वेबसाईट वर मिळतील.
एकदा सर्व कविता नक्की वाचा तुम्हाला खूप आवडतील.

तुम्हाला जर आणखी अश्याच आणखी कविता वाचायच्या असतील तर इंस्टाग्राम वर या पेज ला
नक्की भेट द्या कवितेतली मीमराठी कविता खालील प्रमाणे :


वाट poem by कवितेतली मी Marathi Inspirational Poems
Marathi Inspirational Poems (Marathi Inspirational Poems – by कवितेतलीमी

1. वाट

वाट छोटी किंव्हा मोठी नसते
बघणाऱ्याच्या द्रुष्टीकोनावर
अवलंबून असते ..

जर यशाच्या दृष्टीने पाहाल
तर पुढे जाल
आणि अरे खूपच लांब आहे हि वाट ,
असे म्हणाल तर , तितकेच मागे राहाल

कवितेतली मी


 marathi poems
वाट
Advertisement

2. तुटलेलं मन

कसा सावरु या तुटलेल्या मनाला ,
आवर घातला त्याला तरीही आवरेना
तो स्वतःला ….

या तुटलेल्या मनाची ही दिशा आत्ता
कोणासमोर मी व्यक्त करू
माझी मला काहीच न कळती
आत्ता कसं मी स्वतःला सावरू

सावरायला गेलो असता या तुटलेल्या मनाला,
तोल माझा रे सुटतो पुन्हा एकदा मनाला तुटण्यापासुन मी कितीतरी आवरतो .

या बेचिराख झालेल्या मनाचे तुटलेले हे तुकडे
आजही मि जोडण्याचा प्रयत्न करतो ,
सावर आता स्वताःला हेच तुटलेल्या मनाला मि सांगतो

कवितेतली मी

marathi poems
तुटलेलं मन
Advertisement

आईच जग by कवितेतली मीmarathi poems on mother (marathi poems on mother)

3.आईच जग

आईच जग काही फारस मोठ्ठ नसत …
परिवाराला एकत्र ठेवावं ,
हेच तिचं एकमत असतं ,

दिवसभर स्वतःला वेळ न देता
मुलांना वेळ देणे , हेच तीच नेहमी चालू असतं
आईचं जग काही फारसं मोठ्ठ नसतं

पूर्ण वेळ कामात गुंतून राहणे ,
हेच तीच चालू असता
ह्याला काय हव त्याला काय हवं
हेच तीच नेहमी पाहणं असतं

आईचं जग काही फारसं मोठ्ठ नसतं

पोराना काय हवं नको
ते बघूनदेखील
तू आम्हाला कधीच नाही वेळ देत ,
आम्हाला काय हवं , नको ते तु कधीच नाही पाहत
हेच त्या पोराचं बोलणं असतं

आईचं जग काही फारसं मोठ्ठ नसतं .

कवितेतली मी


marathi poems on mother
आईच जग – marathi poems on mother
Advertisement

marathi kavita

4.आत्मनिर्भर

अजून किती दिवस जगणार
डॉक्टरांच्या मायेखाली
पोलिसांच्या छायेखाली
कितीदा करणार दुसऱ्याच क्लेश
त्यात लोक बदलू पाहतायत वेष
विचार आपण नेहमी दुसऱ्याचा करतो स्वतःसाठी असे आपण किती जगतो
आता हरी आज आत्मनिर्भर होण्याची
आत्मनिर्भर होऊन एकजुटीने राहण्याची

कवितेतली मी


best marathi kavita

5. आत्मविश्वास

ज्यादिवशी तुझा तुझ्यावरच विश्वास
असेल
त्यादिवशी मात्र या जगात तुला
कोणीच हरवणारा नसेल ,

ज्यादिवशी तुझा आत्मविश्वास
प्रबळ असेल ,
त्यादिवशी तुला मागे खेचणारे देखील
या जगात कोणीच नसेल

– – कवितेतली मी


marathi poems , marathi kavita


marathi poems
आत्मविश्वास
Advertisement

Marathi Inspirational Poems by kavitetali mi

6. आयुष्य

आयुष्य किती सोपा वाटतो ना हा शब्द बोलायाला
पण जगताना मात्र आपल्या नाकी नऊ येतात ..
आयुष्य म्हटलं कि त्यात सुख दुःख , अडचण मार्ग
सर्वकाही असत …..

मात्र आपल्या आयुष्यात जर दुःख असेल न तेव्हा कोणीच
आपल्याला साथ देत नाही हे देखील तितकाच खरं असत ….
जर आपण काही वाईट केलं तर १०० जण बोलतील ….
आणि काही चांगलं केलं तर काहीही कष्ट न करता
वर आलाय बोलतील …

जर काही चुकीचं काम केलं तर ती चूक सुधारायची कशी ते सांगायचं सोडून लोक
फक्त आपल्यावर हसतील ….
मात्र ती चूक कशी सुधारायची
हे मात्र कोणीच सांगणार नाही …..
ये जिंदगी हे जनाब इथे लोक स्वतःचा रोल निभावण्यात व्यस्त असतील

कवितेतली मी (श्वेता)

marathi poems
Marathi Inspirational Poems
Advertisement

आयुष्य

marathi poems
आयुष्य — Marathi Inspirational Poems
Advertisement

marathi kavita marathi poems

7.तृतीयपंथी

तृतीयपंथीयांना समाजातले मान
मर्यादा जरा कमीच देतात
पण खरेतर तेच या समाजाचे
अर्धनारीनटेश्वर असतात

त्यांना लोक विविध नावानी संबोधतात
पण ते मात्र नेहमी स्वतःच्या दुनियेत असतात

काही जणांची उदगार हे अत्यंत वाईट
असतात
त्यांना काही लोक शिवीगाळ देखील करतात
पण स्वात:च्या कार्यक्रमात मात्र अगदी
गरज असल्यासारखं त्यांना बोलावणं धाडतात ..

समाजात मुंडन , बारस , लग्न इत्यादीमध्ये
त्यांना सर्व जण फार मान देतात ..
पण जर इतकाच मान द्यायचा असेल तर त्यांना समाजातली लोक
मग वाईट आहेत ते , असं का बरं नेहमी बोलत असतात ..

— कवितेतली मी


marathi kavita – marathi kavita

8.चक्रीवादळ

छोटासाच घर होत माझं
खूप आपुलकीने बांधलेलं
मात्र या चाकरीवादळाने माझं
सर्व काही उध्वस्त केलेलं

कित्येकांचं आयुष्य बरबाद झालेलं
बागायती , शेतीवाडी सर्वच या चक्रीवादळाने नाहीस केलेलं

आईच दुःख पाहून रडू अनावर होत होत
पण आईला सावरून आत्त्ता सर्वच
नव्याने पुन्हा आवरायला घेतला होत ।।।।।

– कवितेतली मी


राजमाता जिजाऊंचे वर्चस्व marathi kavita by kavitetali mi

9. राजमाता जिजाऊंचे वर्चस्व

डोळ्यात तिच्या वेगळेच तेज होते
कोणीही पाहताच क्षणी , तिला
सर्वच गप्पगार होत होते ।।।

डोक्यावर नेहमी पदर , आणि
कापली चंद्रकोर हेच तिचे
सौभाग्याचे लेणे होते ।।

शत्रूला कसे बोलून ठार करावे
हे तिला चांगलेच ठाऊक होते ।।

असेच आमच्या राजमाता जिजाऊंचे वर्चस्व
प्रस्थापित होते

– कवितेतली मी


10. अनाथ

मायेच्या एका स्पर्शासाठी आसुसलेले असतात ते ….
या जगात ज्यांना आई नाही ,ते आईला
पाहण्यासाठी आयुष्यभर तरसात असतात ते
तारसताना आईची ओढ काय असते
हे जाणवते
आणि माझी आई देखील अशीच असेल ती पुन्हा भेटेल का ?
हीच उत्सुकता मनी असते …


– कवितेतली मी


marathi kavita on friends marathi poems on love
मैत्री POEM BY – सृष्टी रोकडे

11.मैत्री

मैत्री करणं वाटत तेवढं सोपं नसत
स्वार्थासाठी केलेलं ते पाहिलं नात असत

तो बोलला तरच मी बोलणार
अहंकार मध्ये ठेऊन त्याच्याशी लढणार

माणूस दिसतो तेवढा तो सुखी नसतो
डोळ्यातील पाणी ढाळत, तो रात्री निजतो

गुपिते सर्व मित्राकडे उघडी आपण करतो
पण का , दडपण असता मनावर , बोलताना त्याच्याशी अडखळतो

मित्र आपल्याला काळजाच्या तुकड्या प्रमाणे असतात
गरजेच्या वेळी का बर ते आठवतात

मित्रपरिवार फक्त एका हाकेवर होतो तय्यार
पण कधीतरी मनामध्ये खोलवर एकटेच असतो ना यार

आनंद , दुःखात साथ द्यायला , मित्र नक्कीच असतात
अडचणीच्या वेळेला हजेरी लावायला कधीतरी , ते मात्र विसरतात

काळानुसार बदलणारे , काहीशे मित्र असतात
बाजी पलटलेली दिसल्यावर , ते पण हात पसरतात

जीव लावावा आयुष्यात कोणावरही , एकदम बिनदास्त
पण करू नका प्रेम कोणावरही स्वतःपेक्षा जास्त

निवडताना मित्रा काळजी घ्या , तुम्ही नक्की
नाहीतर आयुष्यात हिऱ्यापेक्षा सुंदर असते , यारी पक्की

– सृष्टी रोकडे


marathi kavita , marathi prem kavita , prem kavita , marathi prem kavita marathi , poems on love

[ Marathi Inspirational Poems , marathi poems , marathi poems on mother, marathi poems on love , Marathi Inspirational Poems ]


हे सुद्धा वाचा –

Marathi Poems On love

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Leave a Reply

This Post Has 3 Comments